13th May 2022 Important Events : 13 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
13th May 2022 Important Events : मे महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 13 मे चे दिनविशेष.
1925 : दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक डॉ. भालचंद्र दिनकर फडके यांचा जन्म.
डॉ. भालचंद्र दिनकर फडके मराठीतील ख्यातनाम समीक्षक होते. त्यांची समीक्षेवरील अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी ‘कथाकार खानोलकर’ (1969), ‘दलित साहित्य: वेदना आणि विद्रोह’ (1977), ‘मराठी लेखिका: चिंता आणि चिंतन’ (1980) ही काही प्रसिद्ध पुस्तके असून त्यामुळे त्यांच्यावर ‘समीक्षक’ ही मुद्रा उमटली. त्यांची समीक्षा मर्मग्राही, सामाजिक भान जागे करणारी आणि काही प्रमाणात प्रेरणा देणारी होती. दलित साहित्याचा त्यांनी वेळोवेळी घेतलेला धांडोळा साक्षेपी समीक्षेचा एक चांगला प्रकार होता.
1952 : स्वतंत्र भारतातील संसदेचे पहिले अधिवेशन सुरु.
डॉ. राजेंद्रप्रसाद हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर नेते तसेच भारतीय प्रजासत्ताकचे पहिले राष्ट्रपती होते. भारत सरकारने 1962 साली भारतरत्न हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार देऊन त्यांच्या देशसेवेचा बहुमान केला.
1996 : अरुण खोपकर दिग्दर्शित ‘सोच समझके’ या भारतीय कुटुंबनियोजन संस्थेच्या निर्मितीला कुटुंबकल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
2000 : भारताची प्रसिद्ध मॉडेल आणि मिस इंडिया लारा दत्ता हिने 'विश्वसुंदरी' हा किताब पटकावला.
2001 : भारतीय साहित्य लेखक आर. के. नारायण यांचे निधन.
आर. के. नारायण यांचे खरे नाव रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी असे होते. स्वामी अँड फ्रेंड्स (1935) ही त्यांची पहिली कादंबरी. त्यानंतर 'द बॅचलर ऑफ आर्ट्स' (1937), 'द डार्क रूम' (1938), 'द इंग्लिश टीचर' (1946), 'वेटिंग फॉर द महात्मा' (1955), 'द गाइड' (1958), 'मॅनईटर ऑफ मालगुडी' (1962), 'द व्हेंडॉर ऑफ स्वीट्स' (1967) ह्यांसारख्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. ‘मालगुडी’ नावाचे एक दक्षिण भारतीय गाव कल्पून त्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या कथा-कादंबऱ्या रचिल्या आहेत. साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियन लेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जाते. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/1KvaOEp May 2022 Important Events : 11 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
<a href="https://ift.tt/yimDF8E May 2022 Important Events : 5 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
<a href="https://ift.tt/7bXcvF8 Days in May : मे महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
from lifestyle https://ift.tt/C8ogBH2
via IFTTT
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Top Post Ad
Below Post Ad
Ads Section