Coming soon

17th May 2022 Important Events : 17 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

17th May 2022 Important Events : मे महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. मे महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 17 मे चे दिनविशेष.

1792 : न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची स्थापना

16 मे 1792 साली न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली आहे. त्यादरम्यान 24 शेअर दलालांनी वॉल स्ट्रीटवरील बटनवुड करारावर स्वाक्षरी केली. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजचे नंतर  8 मार्च 1817 रोजी न्यूयॉर्क स्टॉक आणि एक्सचेंज बोर्ड असे नामकरण करण्यात आले आहे.

2004 : अमेरिकेतील पहिला कायदेशीर समलिंगी विवाह

2004 साली 16 मे ला अमेरिकेत पहिला कायदेशीर समलिंगी विवाह पार पडला आहे.

1772 : इंग्रज व मराठे यांच्यात झाला सालबाईचा तह

सालबाईचा तह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करारावर 17 मे 1772 रोजी स्वाक्षरी झाली. त्यानंतर हेस्टिंग्जने जून 1782 मध्ये आणि नाना फडणवीस यांनी फेब्रुवारी 1783 मध्ये या करारास मान्यता दिली. या करारामुळे अॅंग्लो-मराठा युद्ध संपायला मदत झाली.

1749 : देवीची लस शोधून काढणाऱ्या डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांचा जन्म

डॉक्टर एडवर्ड जेन्नर हे ब्रिटीश शास्त्रज्ञ होते. एडवर्ड जेन्नर यांना लसीकरणाचे जनक म्हटले जाते. एडवर्ड यांनी देवीची लस शोधून काढली. लस घेतल्यावर माणसाला आजार होत नाही, हे एडवर्ड यांनी शोधून काढलं. डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांचा 17 मे 1749 रोजी जन्म झाला. तर 26 जानेवारी 1823 रोजी मृत्यू झाला.

1865 : इतिहासकार गोविंद सरदेसाई यांचा जन्म

गोविंद सरदेसाई हे मराठी इतिहासकार व लेखक होते. त्यांनी विविध ग्रंथांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सुमारे हजार वर्षांचा इतिहास मांडला आहे. त्यामुळे भारतीय केंद्रशासनाने त्यांना इतिहासविषयक साहित्यातील योगदानासाठी 1957 साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला.

1934 :  अॅपल इन्क कंपनीचे सहसंस्थापक रॉनाल्ड वेन यांचा जन्म

ॲपलची स्थापना करण्यात रॉनाल्ड वेन यांचा मोठा वाटा आहे. रॉनाल्ड वेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एप्रिल 1976 मध्ये अॅपली स्थापना केली होती. 17 मे 1934 साली रॉनाल्ड वेन यांचा जन्म झाला.

1945 : लेगस्पिनर भागवत चंद्रशेखर यांचा जन्म

भारताचा माजी क्रिकेटपटू फिरकीपटू चंद्रशेखर भागवत यांचा 17 मे  1945 रोजी कर्नाटकातील म्हैसूर येथे जन्म झाला. चंद्रशेखर भागवत यांनी 22 फेब्रुवारी 1964 रोजी इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदापर्ण केलं. तर, 12 जुलै 1979 रोजी अखेरचा कसोटी सामना खेळला. या काळात त्यांनी 58 कसोटी सामने खेळले. ज्यात 29.7 सरासरीनं आणि 2.70 इकोनॉमीनं 242 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकमेव एकदिवसीय सामना खेळला. ज्यात त्यांनी 12.0 सरासरीनं आणि 3.85 इकोनॉमी रेटनं तीन विकेट्स घेतल्या.

1979 : अभिनेत्री मुक्ता बर्वेचा वाढदिवस

मुक्ता बर्वे ही मराठी सिने-नाट्यसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. मुक्ता बर्वेने अनेक सिनेमे, नाटक आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. मुक्ताने पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रमधून नाट्यशास्त्राची पदवी मिळवली आहे. मुक्ताला अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत.

2020 : साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचे निधन

साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांचे 18 मे 2020 रोजी निधन झाले आहे. रत्नाकर मतकरी यांनी अनेक नाटकं, एकांकिका, बालनाट्य, कथा, गूढकथा, कांदबरी आणि ललित लेख लिहिले आहेत. तसेच त्यांना महाराष्ट्रात बालरंगभूमीची मुहूर्तमेढदेखील रोवली आहे.  18 मे 2020 ला कोरोनामुळे त्यांचे निधन झाले.

1972 : शिल्पकार रघुनाथ फडके यांचे निधन

1972 साली शिल्पकार रघुनाथ फडके यांचे निधन झाले. महाराष्ट्रातील ख्यातकीर्त शिल्पकार, चित्रकार, संगीत तज्ञ, साहित्यिक व ज्योतिषशास्त्राचे जाणकार अशी रघुनाथ फडके यांची ओळख आहे.

संबंधित बातम्या

<a href="https://ift.tt/QoYPMIl th May 2022 Important Events : 15 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

<a href="https://ift.tt/IioEQaP May 2022 Important Events : 14 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

<a href="https://ift.tt/T0aGBtK May 2022 Important Events : 13 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

from lifestyle https://ift.tt/XeutRy8
via IFTTT

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section