Coming soon

मुंबईच्या विजयानंतर प्लेऑफचं गणित ठरलं, आरसीबी टॉप 4 मध्ये, पाहा वेळापत्रक

IPL 2022, Playoff Qualifiers: मुंबईने अखेरच्या साखळी सामन्यात दिल्लीचा पाच विकेटने पराभव करत यंदाच्या आयपीएलचा शेवट गोड केलाय. दिल्लीने दिलेले 160 धावांचे आव्हान मुंबईने पाच गडी राखून पूर्ण केले.  या पराभवासह दिल्लीचे प्लेऑफचं स्वप्न तुटले आहे. मुंबईच्या विजयामुळे आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचली आहे. गुजरात, राजस्थान, लखनौनंतर आता आरसीबीचा प्लेऑफमध्ये प्रवेश झालाय.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स, केएल राहुलचा लखनौ सुपर जायंट्स आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. त्याशिवाय आरसीबीने आठव्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. आयपीएलमधील साखळी सामने मुंबई आणि पुण्यातील मैदानावर खेळवण्यात आले होते. पण क्वालीफायर 1 आणि एलिमिनेटर कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियम खेळवण्यात येणार आहेत. तर क्लालीफायर 2 आणि फायनलचे सामने अहमदाबाद स्टेडिअमवर होणार आहेत.

कोलकातामध्ये होणार प्लेऑफचे दोन सामने  -
पहिला प्लेऑफ सामना : कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानवर क्वालीफायर 1 सामना होणार आहे. गुणतालिकेतील अव्वल दोन संघामध्ये  24 मे रोजी सामना रंगणार आहे. विजेता संघ थेट फायनलमध्ये धडक मारणार आहे. तर पराभूत झालेल्या संघाला एक संधी मिळणार आहे. पराभूत झालेला संघ क्वालीफायर दोन मध्ये खेळणार आहे. एलिमिनेटरचा विजेता संघ क्वालिफायर दोनमध्ये पोहचतो.

दूसरा प्लेऑफ सामना : एलिमिनेटरचा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर खेळवला जाणार आहे.  25 मे रोजी हा सामना होणार आहे. गुणतालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघामध्ये हा सामना रंगणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर राहुलचा लखनौ संघ आहे.  तर मुंबईच्या विजयानंतर आरसीबी चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. त्यामुळे 25 मे रोजी आरसीबी आणि लखनौ यांच्यात सामना होणार आहे.

प्लेऑफचं वेळापत्रक -
क्वालिफायर 1:  गुजरात vs राजस्थान, 24 मे - कोलकाता
एलिमिनेटर:  लखनौ vs आरसीबी, 25 मे - कोलकाता
क्वालिफायर 2 - 27 मे - अहमदाबाद
फायनल: 29 मे  - अहमदाबाद

from sports https://ift.tt/OQZdAjq
via IFTTT
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section