Coming soon

Beed : बीडच्या अविनाश साबळेने 30 वर्षांपूर्वीचा राष्ट्रीय विक्रम मोडला, अमेरिकेतील स्टीपलचेस स्पर्धेत केली कामगिरी

बीड: जिल्ह्यातल्या मांडवा गावात शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या धावपटू अविनाश साबळे (Avinash Sable) याने बीडचे आणि देशाचे नाव जागतिक स्तरावर कोरलं आहे. अविनाशने अमेरिकेतील सॅन जुआण कॅपिस्टानो येथे झालेल्या साऊंड रनिंग ट्रॅक मीटमध्ये पाच हजार मीटर शर्यतीत (US 5000 m steeplechase) धावून धावपटू बहादूर प्रसाद याने केलेला 30 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे.

वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाश साबळे हा धावण्याचा सराव करतोय. अविनाश साबळेने या आधी टोकियो ऑलिम्पिकमध्ये तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. पण त्याला ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यात यश आले नव्हते.

ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवता आला नसला तरी स्टीपलचेस प्रकारात जागतिक स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता. त्याने केलेल्या या नव्या विक्रमामुळे आता अविनाशला आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन हजार मीटर स्टीपलचेस आणि पाच हजार मीटर या दोन्ही प्रकारात उतरवण्याची तयारी करत असल्याची माहिती भारतीय अॅथलेटिक्सचे मुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.

अविनाश साबळे याने अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये आपल्या धावण्याचा सराव पूर्ण केला. मोलमजुरी करून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. मात्र धावण्यातून आपल्या देशाचं नाव मोठं करण्याचं स्वप्न अविनाश पाहतोय आणि त्यासाठी तो तेवढ्याच हिमतीन सराव देखील करतोय. आता येत्या काळात तो यशाची आणखी शिखरे सर करतोय का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/LZXdUAc Sadavarte : सदावर्ते यांचं लक्ष्य आता 'एसटी बँक', निवडणुकीत पॅनेल उभं करत देणार राष्ट्रवादीला शह

<a href="https://ift.tt/gKXWbkO : युनियन स्थापन करण्यावरून कंपनीतील दोन गटात तुफान दगडफेक; बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घटना

<a href="https://ift.tt/8galExy Thackeray : पाणी देण्याच्या कार्यक्रमात राजकारण आणणार नाही, पण 14 तारखेला अनेकांचा मास्क काढणार: उद्धव ठाकरे

from sports https://ift.tt/YtzhUZP
via IFTTT
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section