IPL 2022: मुंबईच्या वानखेडे मैदानावर पंजाब किंग्ज आणि सनरायजर्स यांच्यात आयपीएल 2022 मधील अखेरचा साखळी सामना खेळला गेला. या सामन्यात पंजाबच्या संघानं 5 विकेट्स राखून हैदराबादचा पराभव करत यंदाच्या हंगामातील शेवट गोड केला. या सामन्यात हैदराबादच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हैदराबादनं 20 षटकात 8 विकेट्स गमावून 157 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबच्या संघानं 16 व्या षटकातचं हैदराबादनं दिलेलं लक्ष्य 16 व्या षटकातचं पूर्ण केलं. या सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या हरप्रीत ब्रारला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं आहे. ब्रारनं चार षटकात 26 धावा देऊन हैदराबादचे तीन महत्वाच्या फलंदाजाला माघारी धाडलं.

आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये हरप्रीत ब्रारची 3.80 कोटींची विक्री
आयपीएलच्या मेगा ऑक्शमध्ये पंजाबच्या संघानं हरप्रीत ब्रारला 3.80 कोटीत विकत घेतलं. यंदाच्या हंगामात त्यानं पाच सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं चार विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान, त्याची इकोनॉमी 9.12 इतकी आहे. तर, त्याची सरासरी 24.00 इतकी आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामात त्यानं सात सामन्यात पाच विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी 19 धावा देऊन तीन विकेट्स घेणं ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

पंजाबचं खराब प्रदर्शन
या हंगामात मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज (PBKS) प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही. या हंगामात गुजरात टायटन्स (GT), राजस्थान रॉयल्स (RR), लखनौ सुपर जॉइंट्स (LSG) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) हे संघ प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. 5 वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स (MI) सलग दुसऱ्या सत्रात प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही. त्याच वेळी, गेल्या हंगामात फायनल खेळलेले दोन्ही संघ म्हणजे चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आयपीएलमधून बाहेर पडले आहेत.

हे देखील वाचा-

<a href="https://ift.tt/EVnUFGi Dev: कपिल देव यांचा राजकारणात प्रवेश? अखेर सत्य समोर आलं

<a href="https://ift.tt/LXp60a9 vs SA: शिखर धवनपासून संजू सॅमसनपर्यंत, 'या' खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत संधी नाही

<a href="https://ift.tt/TNDKeg9 vs SA T20 Series: प्रयत्नांती परमेश्वर! तीन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर 'या' खेळाडूची भारतीय संघात एन्ट्री

from sports https://ift.tt/h16NcHd
via IFTTT