IPL 2022 : खराब फॉर्मनंतरही विराट कोहलीने केला भीमपराक्रम

IPL 2022 Marathi news: विराट कोहली मागील काही दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. विराटच्या बॅटमधून धावा निघत नाहीत. पंजाबविरोधातही विराट कोहलीला मोठी खेळी करण्यात अपयश आले. पण विराट कोहलीने आयपीएलमध्ये मोठा पराक्रम केलाय. धोनी, रोहित शर्मा यांनाही हा पराक्रम करता आला नाही. विराट कोहलीने आयपीएलमध्ये 6500 धावांचा पल्ला पार केलाय. आयपीएलमध्ये साडेसहा हजार धावांचा टप्पा पार करणारा विराट कोहली पहिला फलंदाज ठरलाय.

पंजाब किंग्सने दिलेल्या 210 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीची सरुवात खराब झाली. फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली झटपट माघारी परतले. विराट कोहली 14 चेंडूत 20 धावा काढून बाद झाला. या छोटेशा खेळीतही विराट कोहलीने भीमपराक्रम केलाय. विराट कोहलीने आयपीएल करिअरमध्ये 6500 धावांचा टप्पा पार केलाय.

आयपीएलमध्ये 6500 धावा करणारा विराट कोहली पहिला फलंदाज आहे. इतकेच नाही तर फ्रेंचाइजी टी20 लीगमध्ये इतक्या धावा काढणारा विराट एकटाच फलंदाज आहे. तसेच एकाच फ्रेंचाइजीकडून इतक्या धावा काढणाराही विराट कोहली एकमेव फलंदाज आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज -
विराट कोहली - 6519
शिखर धवन  6186
डेविड वॉर्नर  - 5876
रोहित शर्मा - 5829
सुरेश रैने - 5528
एबी डिव्हिलिअर्स - 5162

कोहलीची आयपीएलमधील कामगिरी -
विराट कोहलीने आरसीबीकडून खेळताना 218 सामन्यातील 212 डावात 36.51 च्या सरासरीने 6519 धावा केल्या आहेत. यामध्ये पाच शतके आणि 43 अर्धशतके आहेत. विराट कोहलीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 214 षटकार आणि 566 चौकार लगाववे आहेत.

यंदाच्या हंगामातील विराट कोहलीची कामगिरी -
यंदाच्या हंगामात विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहलीने 13 सामन्यात एका अर्धशतकासह 236 धावा केल्या आहेत. विराट कोहली यंदाच्या हंगामात तीन वेळा डक बाद झालाय.

हे देखील वाचा-

<a href="https://ift.tt/ZRaKt37 2022: 'मुंबईत आलो तेव्हा माझ्याकडं कपडे नव्हते, टॉवेलवर दोन-तीन दिवस काढले' रोव्हमन पॉवेलनं ऐकवला तो किस्सा

<a href="https://ift.tt/PZeA4Bj Shivam Dube : चेन्नईत आल्यावर शिवम दुबे दमदार फॉर्ममागे येण्याचं कारण काय? सुनील गावस्कर म्हणाले...

<a href="https://ift.tt/Wiw4ky9 Kohli : ज्या-ज्या वेळी शून्यावर बाद त्या-त्या वेळी विराट हसत मैदानाबाहेर,कोहलीच्या या 'हास्या'मागे खरं कारण काय?

from sports https://ift.tt/zCMStfP
via IFTTT
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section