Nagpur <a href="https://ift.tt/6GwZWpS : सध्या घरातल्या चिमुकल्यांची सुट्टी सुरु आहे. कोरोनाची प्रकरणे कमी झाली असल्याने महाराष्ट्रातील अनेक पर्यटनस्थळे देखील सुरु झाली आहेत. मे महिना म्हटलं की, पिकनिकचे प्लॅन्स नक्कीच बनतात. सध्या कोरोनाच्या धास्तीमुळे लोक जवळची ठिकाणं फिरणं पसंत करतात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरांत आणि जिल्ह्यात पर्यटनाची किंवा आवर्जून पाहावीत अशी ठिकाणं आहेत. तुम्ही देखील कमी वेळात आणि महाराष्ट्रातच फिरण्याची योजना आखत असाल, तर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला (Nagpur) भेट देण्याची योजना नक्की बनवा.

नागपूर हे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख शहर आहे. रसाळ संत्र्यांसाठी नागपूर प्रसिद्ध आहेच, मात्र याशिवाय देखील अनेक गोष्टींसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी म्हटले जाते. नागपूरला जाण्याची योजना आखत असाल तर, ‘शून्य मैला’चा दगड ते रामटेकचा किल्ला, अशा काही सुंदर आणि ऐतिहासिक स्थळांना भेट दिलीच पाहिजे.

शून्य मैलाचा दगड : नागपूर म्हटले की, पटकन आठवणारी गोष्ट म्हणजे शून्य मैलाचा दगड. शून्य मैलाचा दगड म्हणजेच ‘झिरो माईल्स स्टोन’. नागपूरचे भौगोलिक स्थान ठळक करण्याच्या दृष्टीने हा दगड अतिशय महत्त्वाचा आहे. देशाचा मध्य म्हणून नागपूरच्या शून्य मैलाच्या दगडाचे वैशिष्ट्ये महत्त्वाचे आहे. नागपूरला भेट देणार असाल, तर या ठिकाणाला नक्कीच भेट द्या.

रामटेकचा किल्ला : नागपूरचा रामटेक किल्ला त्याच्याशी संबंधित पौराणिक कथांमुळे विशेष प्रसिद्ध आहे. वनवासाच्या काळात भगवान श्री राम, आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासोबत या ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी थांबले होते, असे म्हटले जाते. या ठिकाणी भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात.

ड्रॅगन पॅलेस टेंपल : नागपूर शहरापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर कांपी नावाचे एक ठिकाण आहे, जेथे हे बौद्ध मंदिर वसलेले आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या मंदिराला भेट देतात. येथे, अनेक भाविक बौद्ध प्रार्थना आणि तासन तास ध्यानधारणा करताना दिसतात. ड्रॅगन पॅलेस या बौद्ध मंदिराला नागपूरचे ‘लोटस टेंपल’ असेही म्हणतात.

पेंच राष्ट्रीय उद्यान : प्रसिद्ध पेंच राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प नागपूर जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र सरकारने 1975 मध्ये या उद्यानाला ‘राष्ट्रीय उद्यान’ म्हणून जाहीर केले. 1999 मध्ये या उद्यानाला व्याघ्र प्रकल्प असा अधिकृत दर्जा देण्यात आला. पेंच नदीमुळेसजा या ठिकाणाला ‘पेंच उद्यान’ हे नाव देण्यात आले आहे.

दीक्षाभूमी स्तूप : नागपुरातील दीक्षाभूमी स्तूप हे बौद्ध धर्माची सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र वास्तू आहे. या स्तूपाची उंची 120 फूट आहे, याला आशियातील सर्वात मोठा स्तूप म्हणतात. याच ठिकाणी अनेक लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.

हेही वाचा :

<a href="https://ift.tt/bNG05ix Tips: मित्रांसोबत कॅम्पिंगचा प्लॅन करताय? मग, ‘या’ टिप्स खास तुमच्यासाठी...

<a href="https://ift.tt/eAgsrNl : भारतातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळे, वर्षभर असते पर्यटकांची वर्दळ!

<a href="https://ift.tt/EG4aIwm : पुण्यात फिरण्याची योजना बनवताय? मग, ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या!

from lifestyle https://ift.tt/Z8VQ6u7
via IFTTT