Coming soon

PBKS vs DC: दिल्लीचा पंजाबवर 17 धावांनी विजय, पाहा सामन्यातील दहा महत्वाचे मुद्दे

PBKS vs DC: दिल्लीच्या भेदक गोलंदाजीसमोर पंजाबच्या फलंदाजांनी गुढघे टेकले. दिल्लीकडून शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) उत्कृष्ट गोलंदाजी केली. ज्यामुळं अतितटीच्या सामन्यात दिल्लीच्या संघानं 17 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दिल्लीच्या संघानं 20 षटकात सात विकेट्स गमावून पंजाबसमोर 160 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात पंजाबच्या संघाला 20 षटकात 142 धावाचं करता आल्या. पंजाबकडून जितेश शर्मानं (Jitesh Sharma) सर्वाधिक 44 धावांची खेळी केली.

पंजाब- दिल्ली सामन्यातील दहा महत्वाचे मुद्दे

-दिल्लीविरुद्ध नाणेफेक जिंकून पंजाबच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

-दरम्यान, लियाम लिव्हिंगस्टोननं सामन्यातील पहिल्याच चेंडूवर डेव्हिड वार्नरला बाद करून दिल्लीला पहिला धक्का दिला.

- त्यानंतर सर्फराज खान आणि मिचेल मार्शनं संघाचा डाव सावरला. दोघांमध्ये 51 धावांची भागेदारी झाली.

- सर्फराज खान बाद झाल्यानंतर मिचेश मार्शनं ललित यादवला सोबत घेऊन संघाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. दिल्लीसाठी मिचेल मार्शनं 48 चेंडूत 63 धावा केल्या.

- दिल्लीनं 20 षटकात सात विकेट्स गमावून पंजाबसमोर 160 धावांचं लक्ष्य ठेवलं.

- दिल्लीनं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पंजाबचे सलामीवीर जॉनी बेअरेस्टो आणि शिखर धवननं संघाला चांगली सुरुवात करून दिली.

- परंतु, पंजाबच्या डावातील तिसऱ्या षटकात एनरिच नॉर्टिजेच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्टो (15 चेंडू 28 धावा) बाद झाला. त्यानंतर सहाव्या षटकात शिखर धवनंही (16 चेंडू 19 धावा) त्याची विकेट गमावली.

- या सामन्यात भानुका राजपक्षे, लियाम लिव्हिंगस्टोन आणि मयांक अग्रवाल या तिघांना पाच धावांचा आकडाही गाठता आला नाही.

- पंजाबकडून जितेश शर्मानं एकाकी झुंज दिली. त्यानं 34 चेंडूत 44 धावा केल्या. त्याला दुसऱ्या बाजूनं साथ मिळाली नाही.

- पंजाबला 20 षटकात 9 विकेट्स गमावून 142 धावा करता आल्या.

हे देखील वाचा-

<a href="https://ift.tt/nE2oraP 2022: मुंबईच्या संघात मोठा बदल, सूर्यकुमार यादवच्या जागेवर 'या' खेळाडूचा संघात समावेश

<a href="https://ift.tt/r6OEnHo Sen Rewarded: कर्नाटक सरकारकडून लक्ष्य सेनला पाच लाखांचं बक्षीस जाहीर

<a href="https://ift.tt/lYkSRji vs DC: पंजाबकडून जितेश शर्मा एकटाच झुंजला! शार्दुल ठाकूरचा भेदक मारा, दिल्लीचा 17 धावांनी विजय

from sports https://ift.tt/sNUKhdZ
via IFTTT
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section