Coming soon

Top 10 Key Points : मुंबईचा शेवट गोड, दिल्लीचं स्वप्न भंगलं, सामन्यातील 10 महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर

Mumbai Indians vs Delhi Capitals Top 10 Key Points : अखेरच्या साखळी सामन्यात मुंबईने दिल्लीचा पाच विकेटने पराभव करत यंदाच्या आयपीएलचा शेवट गोड केलाय. दिल्लीने दिलेले 160 धावांचे आव्हान मुंबईने पाच गडी राखून पूर्ण केले. मुंबईची यंदीची कामगिरी निराशाजनक राहिली असली तरी शेवट गोड केलाय. या पराभवासह दिल्लीचे प्लेऑफचं स्वप्न तुटले आहे. मुंबईच्या विजयामुळे आरसीबी प्लेऑफमध्ये पोहचला आहे.  आज झालेल्या सामन्यातील महत्त्वाच्या 10 मुद्द्यांवर एक नजर फिरवूयात...

प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दिल्लीच्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. दिल्लीच्या डावातील तिसऱ्याच षटकात जसप्रीत बुमराहनं डेव्हिड वार्नरच्या (5 धावा) रुपात दिल्लीला पहिला धक्का दिला. त्यानंतर मिचेश मार्शही (0 धाव) डेनियल सॅम्सच्या गोलंदाजीचा शिकार ठरला.

गेल्या काही सामन्यांपासून संघाबाहेर असलेल्या पृथ्वी शॉ (24 धावा) आजच्या सामन्यात मोठी धावसंख्या करेल, अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, तोही पावर प्लेच्या अखेरच्या षटकात बाद झाला.

दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतनं सघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही संघाची धावसंख्या पुढे नेता आली नाही. त्यानं 33 चेंडूत 39 धावा केल्या. दिल्लीकडून रोव्हमन पॉवेलनं सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. ज्यात चार षटकार आणि एक चौकाराचा समावेश होता.

रोव्हमन पॉवेल बाद झाल्यानंतर दिल्लीच्या कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा गाठता आला नाही.

मुंबईकडून जसप्रीत बुमराहनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, रमनदीप सिंहला दोन विकेट्स मिळाल्या. याशिवाय, डेनियल्स सॅम्स, मयांक मार्कंडेय यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.

160 धावांचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा संघर्ष करताना पाहायाला मिळला. रोहित शर्मा 13 चेंडूत दोन धावा काढून बाद झाला.

ईशान किशन आणि डोवॉल्ड ब्रेविस यांनी मुंबईचा डाव सावरला. दोंघानी दुसऱ्या विकेटसाठी  51 धावांची भागिदारी केली. ईशान किशन  48 धावांवर बाद झाला. त्यानंतर डेवॉल्ड ब्रेविसही 37 धावा काढून बाद झाला.

टीम डेविड आणि तिलक वर्मा यांनी मुंबईचा विजय दृष्टीक्षेपात आणला. मुंबई जिंकणार असे वाटत असतानाच दोघेही बाद झाले. त्यानंतर डॅनिअल सॅम्स आणि रमनदीप सिंह यांनी मुंबईला विजय मिळवून दिला.

ईशान किशन ४८, रोहित शर्मा २, डेवॉल्ड ब्रेविस ३७, तिलक वर्मा २१, टीम डेविड ३४ रमनदीप सिंह १३ यांनी महत्वाची खेळी केली. दिल्लीकडून नॉर्त्जे आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर कुलदीप यादवला एक विकेट मिळाली.

from sports https://ift.tt/0oiHlAp
via IFTTT
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section