WhatsApp New Feature : व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये (Whatsapp Status) एक नवीन फीचर जोडण्यात येणार आहे. रिपोर्टनुसार, आता लिंक प्रिव्ह्यू-व्ह्यू स्टेटसमध्येही दिसेल. सध्या, जेव्हा स्टेटसमध्ये कोणतीही URL किंवा लिंक शेअर करतो तेव्हा तुम्हाला फक्त URL दिसते, परंतु नवीन अपडेटनंतर, थंब इमेजसह मेटा डिस्क्रिप्शन देखील दिसून येईल. सोप्या भाषेत सांगायचे तर, नवीन अपडेटनंतर प्लेन-url दिसणार नाही.

स्टेटस अपडेटची चाचणी
व्हॉट्सॲपच्या फीचरचा मागोवा घेणाऱ्या WABetaInfo ने नवीन अपडेटची माहिती दिली आहे. WABetaInfo च्या रिपोर्टमध्ये असं म्हटलंय की, नवीन फीचरची iOS च्या बीटा आवृत्तीवर चाचणी केली जात आहे. नवीन अपडेटचा स्क्रीनशॉट देखील समोर आला आहे. नवीन अपडेटची लवकरच Android आणि डेस्कटॉपवर चाचणी केली जाईल. 2017 मध्ये WhatsApp ने चॅटसाठी रीच लिंक प्रीव्ह्यूचे अपडेट जारी केले होते आणि आता ते स्टेटससाठी देखील तपासले जात आहे. व्हॉट्सअॅप अँड्रॉइड अॅपसाठी स्टेटस या नवीन फीचरचीही चाचणी करत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 512 लोकांना जोडू शकाल.

मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी अलीकडेच व्हॉट्सॲप इमोजीवर प्रतिक्रिया जाहीर केली. याशिवाय आणखी एक मोठे फीचर व्हॉट्सअॅपमध्ये जोडले जात आहे. व्हॉट्सअॅपमध्ये, तुम्हाला खूप लोक जोडण्यासाठी दोन गट तयार करण्याची आवश्यकता नाही, कारण लवकरच तुम्ही एकाच व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 512 लोकांना जोडू शकाल.

सध्या, व्हॉट्सॲपच्या या नवीन वैशिष्ट्याची बीटा आवृत्तीवर चाचणी केली जात आहे आणि त्याचे अपडेट सर्वांसाठी केव्हा जारी करण्यात येतील? याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. सध्या एका ग्रुपमध्ये 256 लोकांनाच जोडता येते.

हे देखील वाचा-

<a href="https://ift.tt/0AaK4fl teases Pixel 7 : गुगलने Pixel 7 Series ते Pixel Earbuds Pro पर्यंत हे फीचर्स लॉन्च केले

<a href="https://ift.tt/YFbxPa0 : व्हॉट्सअप Reaction Feature फीचर कसे वापरावे? जाणून घ्या A to Z माहिती

<a href="https://ift.tt/LY1kTcg नेटवर्क येतंय, 5G पेक्षा 50 पट जास्त असेल इंटरनेट स्पीड; जाणून घ्या काय होणार फायदे

from technology https://ift.tt/YtmiE0v
via IFTTT
WhatsApp मध्ये येणार नवीन अपडेट, आता स्टेटस अपडेट 'असे' दिसेल, जाणून घ्या
0
मे १७, २०२२
Tags