Father’s Day 2022 Google Doodle : खास डूडलद्वारे गुगलने दिल्या ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा! जाणून घ्या का साजरा केला जातो ‘हा’ दिवस...

Father’s Day 2022 Google Doodle : आपले ‘बाबा’ म्हणजे आपल्या घराचा कणा. आई मायेची सावली, तर बाबा कुटुंबासाठी वटवृक्षा समान असतात. आपल्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती अर्थात बाबांना ते किती महत्त्वाचे आहे, हे व्यक्त करण्यासाठीचा एक खास दिवस म्हणजे ‘पितृ दिन’ अर्थात ‘फादर्स डे’ (Father’s Day 2022). आपले एखाद्यावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी विशिष्ट दिवसाची गरज नसते. मात्र, खास दिवशी खास पद्धतीने शुभेच्छा देऊन हा दिवस आणखी स्पेशल बनवला जातो. याच खास दिवसाला आणखी खास बनवण्यासाठी गुगलने देखील एक विशेष डूडल तयार केले आहे.

या खास गुगल डूडलद्वारे त्यांनी सर्व वापरकर्त्यांना ‘फादर्स डे’च्या शुभेच्छा दिल्या आहे. सर्च इंजिन गुगलने आज 19 जून 2022 रोजी ‘फादर्स डे’चे निमित्त साधत हे खास डूडल बनवले आहे. समस्त वडिलांना समर्पित असलेल्या ‘फादर्स डे’च्या या डूडलमध्ये एका लहान मुलाचा हात आणि त्याच्या वडिलांचा हात दिसत आहे. हे दोघे मिळून छानसं चित्र तयार करत आहेत.

कधीपासून सुरु झाली ‘या’ दिवसाची सुरुवात?

पहिला पितृदिन अर्थात ‘फादर्स डे’ 19 जून 1909 मध्ये साजरा केला गेला होता. वॉशिंग्टनच्या स्पोकेन शहरात राहणाऱ्या सोनोरा डॉड हिने आपल्या वडीलांच्या आठवणींत या दिवसाची सुरुवात केली होती. आपल्या सहाव्या भावंडाला जन्म देताना सोनोराची आई मरण पावली. त्यानंतर सोनोराने वडिलांच्या मदतीने भावंडांना लहानाचं मोठ केलं. या दरम्यान सोनोराला वाटले की, आईच्या मायेचं महत्त्व सगळेच सांगतात, सगळीकडे मदर्स डे साजरा केला जातो. आईसोबतच वडिलांनाच्या प्रेमालादेखील अशाच विशेष ओळखीची गरज आहे, असे तिला वाटले.

आपल्या वडिलांबद्दल अत्यंत प्रेम आणि आदर असणाऱ्या सोनोराने यासंदर्भात स्पोकेन मंत्रिमंडळाशी संपर्क साधला. तिने आपल्या वडिलांचा वाढदिवस अर्थात 5 जून हा दिवस ‘फादर्स डे’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांनी तिचा प्रस्ताव स्वीकारला मात्र, हा दिवस तिच्या वडिलांच्या वाढदिवसाऐवजी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ठेवण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी ‘फादर्स डे’ साजरा केला जातो. यानंतर या कायदेशीर मान्यता देखील मिळाली.

हेही वाचा :

<a href="https://ift.tt/kyIToBE Day 2022 : कुटुंबाचा आधारस्तंभ असणाऱ्या 'फादर्स डे' चा इतिहास जाणून घ्या...

<a href="https://ift.tt/QTINwVL Day 2022 : 'या' अनोख्या भेटवस्तू देऊन वडिलांना शुभेच्छा द्या; 'फादर्स डे' होईल खास

from lifestyle https://ift.tt/9NwIiWn
via IFTTT

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section