Monsoon Tips : पावसाळ्यात निरोगी राहायचंय? मग या 5 गोष्टी टाळा

Food Infection In Monsoon : कडक उन्हाळ्यानंतर आता पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात अनेकांना फिरायला, भिजायला, नाचायला, बाहेर जेवण करायला आवडते. हा पावसाळा अगदी चहा भजीपासून ते स्ट्रीट फूडपर्यंत लोक अगदी मनसोक्त आनंद घेतात.    पण या ऋतूत काळजी घेण्याची गरज आहे. तुमचा निष्काळजीपणा तुम्हाला आजारी बनवू शकतो. पावसात रोग आणि संसर्ग झपाट्याने पसरतात. पावसाळ्यात बहुतेक संसर्ग बाहेरील अन्नातून पसरतो. याशिवाय कच्च्या आणि हिरव्या पालेभाज्याही या ऋतूत तुम्हाला आजारी पाडतात. त्यामुळे तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा.

1. स्ट्रीट फूड टाळा : पावसात बाहेरचं अन्न खायला प्रत्येकाला आवडते. पण जर तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर तुम्हाला बाहेरचं अन्न टाळावं लागेल. स्ट्रीट फूड बनवताना स्वच्छतेची फारशी काळजी घेतली जात नाही. अशा स्थितीत अनेकवेळा तळलेले पदार्थ खाल्ल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो.

2. कच्चे खाणे टाळा : पावसाळ्यात कच्चे अन्न खाणे टाळावे. या ऋतूमध्ये मेटाबॉलिज्म मंद गतीने काम करते. त्यामुळे अन्न उशिरा पचते. पावसात बाहेरचा ज्यूस आणि सॅलड खाणे टाळा. उशिरा कापलेली फळे खाऊ नयेत.

3. उकळून पाणी प्या : पावसात पाण्यात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया वाढू लागतात, त्यामुळे पाणी उकळल्यानंतरच पिण्याचा प्रयत्न करा. उकळत्या पाण्यात सर्व प्रकारचे जीवाणू नष्ट होतात. उकळलेले पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन आणि डायरियासारखे आजार होत नाहीत.

4. प्रतिकारशक्ती वाढवा : पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोष्टी खाव्यात. ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, ते या ऋतूत लवकर आजारी पडतात. म्हणूनच तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी तुम्ही काम केले पाहिजे. सुका मेवा, कॉर्न, गहू, बेसन यांसारख्या धान्यांचा आहारात समावेश करावा.

5. थंड आणि आंबट पदार्थ टाळा : पावसाळ्यात घशाचा संसर्ग झपाट्याने होतो. अशा परिस्थितीत तुम्ही थंड पदार्थ जसे की आईस्क्रीम, ज्यूस किंवा शेक पिणे टाळावे. या ऋतूत रेफ्रिजरेटरचे पाणी पिऊ नका. याशिवाय आंबट पदार्थांचे सेवन कमीत कमी करा. यामुळे घसा दुखण्याचा धोका असतो.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/Ep6yiWn Tips : यकृतासाठी या 5 गोष्टी आहेत वरदान; रक्तही होईल स्वच्छ

<a href="https://ift.tt/FyuGwS4 Control : शुगर कंट्रोलही करायचाय आणि गोडही टाळता येत नाहीये? तर, 'हे' 5 उपाय फॉलो करा

<a href="https://ift.tt/48bxHyn : पुरेसे पाणी पिऊनही वारंवार उचकी का येते? जाणून घ्या कारणे आणि उपाय

from lifestyle https://ift.tt/7h8fwEP
via IFTTT

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section