Ranji Trophy 2022 Final Live Updates: दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाच मुंबईला दोन मोठे झटके, सरफराज खान क्रिजवर

Ranji Trophy 2022 Final Live Updates: दिमाखदार सलामीनंतरही मुंबईला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या Madhya (Pradesh vs Mumbai) पहिल्या दिवशी पाच फलंदाजांना गमावून फक्त 248 धावाच उभारता आल्या. या डावात मुंबईचा यशस्वी जैस्वालनं (Yashasvi Jaiswal) 163 चेंडूत 78 धावांची खेळी केली. तर, कर्णधार पृथ्वी शॉनं (Prithvi Shaw) 79 चेंडूत 47 धावा केल्या.

या सामन्यात मुंबईच्या संघानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर संघाकडून सलामी देण्यासाठी  पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल मैदानात उतरले. दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या पृथ्वी शॉला अनुभव अगरवालनं बाद करून माघारी धाडलं.

दरम्यान, यशस्वीनं संघाचा डाव सावरत खेळ पुढे नेला.  या सामन्यात अरमान जाफर 26 आणि सुवेद पारकरनं 18 धावांची खेळी केली. त्यानंतर यशस्वीही तंबूत परतला. अनुभवनेच त्यालाही बाद केलं. यशस्वीनंतर  हार्दिक टामोरेही 24 धावा करुन माघारी परतला. सध्या सरफराज खान 40 धावांवर भक्कम स्थितीत आहे. तर शम्स मुलीनीही 12 धावांवर खेळत आहे. मध्यप्रदेशकडून अनुभव अगरवाल आणि सारांश जैन यांनी प्रत्येकी दोन-दोन तर, कुमार कार्तिकेयनं एक विकेट घेतली आहे.

हे देखील वाचा-

<a href="https://ift.tt/upKyFMt Warner: एका धावानं डेव्हिड वार्नरचं शतक हुकलं! कसा झाला आऊट? पाहा व्हिडिओ

<a href="https://ift.tt/fotNnpR Warner: ऐकत नाही भाऊ! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेव्हिड वार्नरच्या 16000 धावा, दिग्गजांच्या पंक्तीत स्थान!

<a href="https://ift.tt/4xgyqGO Dravid: भारतीय युवा वेगवान गोलंदाजांबाबत राहुल द्रविडचं मत काय?

from sports https://ift.tt/4izrqgv
via IFTTT
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section