T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषकात कोण ठरु शकतो भारतासाठी हुकूमी एक्का? सुनील गावस्कर म्हणाले

T20 World Cup 2022 : भारतीय संघ आगामी टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) जिंकण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार यात शंका नाही. पण नेमकी संधी कोणत्या खेळाडूंना मिळणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे अनेक तज्ज्ञ आपआपली मतं देत आहेत. अशामध्ये माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनीही या स्पर्धेत कोणता खेळाडू हुकूमाचा एक्का ठरेल हे सांगतिलं आहे. सुनील यांनी युवा गोलंदाज हर्षल पटेल (Harshal Patel) टी20 विश्वचषकात भारताचा ट्रंप कार्ड ठरेल अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हर्षल पटेलबाबत बोलताना सुनील गावस्कर म्हणाले, ''हर्षलने नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात शानदार गोलंदाजी केली. खासकरुन डेथ ओव्हर्समध्ये त्याने दमदार गोलंदाजी करत उत्तम स्लोवर बॉल्स टाकले. अशी कला सध्या संघात कोणाकडे नाही. तिसऱ्या सामन्यात त्याने महत्त्वाचे विकेट्सही घेतले. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज नीट फलंदाजी करु शकले नाहीत. तो एक चांगला अष्टपैलू गोलंदाजही बनू शकतो. दबावाखाली आणि संघ अडचणीत असताना चांगली गोलंदाजी हर्षलला येते.''

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हर्षलची कामगिरी

नुकतीच झालेली भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) टी20 मालिका 2-2 च्या फरकाने अनिर्णीत सुटली. यावेळी युवा खेळाडूंनी अखेरच्या दोन सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. हर्षल पटेलनेही शानदार प्रदर्शन दाखवलं. त्याने चार सामन्यात 7.23 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजी करत 7 विकेट्स मिळवले. आता आयर्लंड दौऱ्यातही तो सिलेक्ट झाला असून तो त्यातही चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

हे देखील वाचा-

<a href="https://ift.tt/MWmPnzR World Cup 2022 : भारताकडून विश्वचषकात कार्तिक की पंत कोणाची लागणार वर्णी, कशी आहे दोघांची आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्द

<a href="https://ift.tt/N8wd4Hn World Cup मध्ये रोहित-विराट नाही तर दिनेश-हार्दिक ठरतील टीम इंडियासाठी X Factor, माजी दिग्गज खेळाडूची प्रतिक्रिया

<a href="https://ift.tt/MndktXm vs Ireland: आयर्लंड दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला बीसीसीआयकडून स्पेशल गिफ्ट!

from sports https://ift.tt/NMptJsh
via IFTTT
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section