Coming soon
5th August 2022 Important Events : 5 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
5th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. आज 5 ऑगस्ट आजचा दिवस म्हणजे श्रावणातील दुसरा शुक्रवार म्हणजेच जरा-जिवंतिक पूजनाचा दिवस. श्रावणात दर शुक्रवारी जरा-जिवंतिका पूजन केले जाते. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 5 ऑगस्ट दिनविशेष.
जरा-जिवंतिक पूजन :
श्रावणात दर शुक्रवारी जरा-जिवंतिका पूजन केले जाते. जरा ही मूळची राक्षसी होती. ती मगध देशात असे. मगध नरेश वृद्धाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. तो जन्मताच त्याला नगराबाहेर फेकून देण्यात आले. त्यावेळी ह्या जरा राक्षसीने ती दोन शकले एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक ‘जरासंध’ ह्मा नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली. महाराष्ट्रात अशीच जिवतीची पूजा श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी केली जाते. त्यासाठी आजूबाजूला बरीच लहान मुले असलेला जिवंतिका म्हणजे जिवतीचे चित्र भिंतीवर लावले जाते अथवा गंधाने काढले जाते. असे चित्र काढून मग तिची पूजा करावी. ह्या पूजेसाठी दूर्वा, फुले, आघाड्याची पाने असणे आवश्यक मानले आहे. ह्मा तिन्हींची माळ करून ती जिवतीला घालावी. पुरणा-वरणाचा नैवेद्य दाखवावा. मग पूजेला बोलाविलेल्या स्त्रियांना हळदकुंकू देऊन जेवू घालावे.
सन 1962 साली देशांतील संपावर गेलेल्या कामगारांना चिथावणीखोर भाषण केल्या प्रकरणी आणि पासपोर्टविना देश सोडून जाण्याच्या आरोपाखाली नेल्सन मंडेला यांना तुरुंगवास भोगावा लागला.
सन 1991 साली दिल्ली येथील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी विराजमान होणाऱ्या न्यायमूर्ती लीला सेठ या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.
इ.स. 1890 साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन इतिहासकार, लेखक आणि वक्ते तसेच, पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू दत्तात्रय वामन पोतदार उर्फ दत्तो वामन पोतदार यांचा जन्मदिन.
सन 1930 साली अमेरिकन अंतराळवीर आणि वैमानिकी अभियंता तसचं, चंद्रावर पाय ठेवणारे पहिले व्यक्ती नील एल्डन आर्मस्ट्राँग (Neil Armstrong) यांचा जन्मदिन.
सन 1933 साली महाराष्ट्रातील मराठी लेखिका आणि समिक्षक, तसचं, 74 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा विजया राजाध्यक्ष यांचा जन्मदिन.
महत्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/wNac641 August 2022 Important Events : 2 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
<a href="https://ift.tt/brDBadA Days in August : ऑगस्ट महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
<a href="https://ift.tt/n1voVM5 2022 : श्रावण महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
from lifestyle https://ift.tt/H5pdteQ
via IFTTT
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Top Post Ad
Below Post Ad
Ads Section