Coming soon

Beauty Parlor : ब्युटी पार्लर यशस्वीपणे कसे चालवावे? या आहेत सोप्या टिप्स

मुंबई: कोणत्याही व्यवसायासमोरील प्रमुख आव्हान म्हणजे त्या व्यवसायातील ग्राहकांची गरज समजून घेणे आणि मनुष्यबळाचे व्यवस्थापन करायला शिकणे. सलून व्यवसाय इतर कोणत्याही व्यवसायाहून वेगळा नाही. फक्त नफा कमावण्यासाठी सलून व्यवसाय चालू करण्यापेक्षा ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवल्यात त्यातून मोठा फायदा होऊ शकतो.

केवळ प्रमाणपत्र घेतल्याने किंवा कोर्स केल्याने हा व्यवसाय चालू करता येईल असे नाही. मुळात, कुठलीही  नवीन गोष्ट  चालू करणे सुरुवातीला कठीण असते, पण योग्य तयारी आणि नियोजन केल्यास आपण सहजरित्या ती करू शकतो. सलूनचा बिझनेस योग्य प्रकारे चालविण्यासाठी पुढील गोष्टी विचारात घ्या,

1. व्यावसायिक दृष्टीकोन जोपासणे - सलून म्हणजे एक ऑफिसच आहे असं समजा. समस्यांचा सामना करायला तयार राहा. जसे की, कर्मचारी सोडून जाणे,नवीन ग्राहक न मिळणे, कर्मचारी तुमचे न ऐकणे. काहीही झाले तरी मागे हटू नका. सर्व समस्यांचे समाधान असते असा दृष्टीकोन ठेवा.ध्येय ठरवा आणि ते ध्येय गाठण्यासाठीचे नियोजन करा.
2. सलूनचे ठिकाण- योग्य जागा मिळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा. जर तुम्हाला व्यवसाय चालू करायचा असेल तर, तुमच्या घरातूनच सुरुवात करु नका. तुमचे सलून ठळकपणे दिसायला हवे. यासाठी रंगीत फलकांचा वापर करा.
3. मार्केटिंग / विपणन - ह्या शब्दाला घाबरू नका. असे समजू नका की, ते आपल्याला परवडणार नाही. पण विचार करून पैसे खर्च करा. मार्केटिंग / विपणन हा खर्च नसून गुंतवणूक असते. तुमचा गूगल आणि सोशल मीडियावर वावर हवा. त्यात सातत्य हवे. एखाद्या व्यवसायाचे नाव लक्षात ठेवण्याची ग्राहकांची स्मरणशक्ती कमी असते. नेमकी इथेच तुम्हाला गुंतवणूक गरजेची बनते.
4. कर्मचारी व्यवस्थापन - कर्मचारी हा व्यवसायाचा आत्मा असतो. त्यांना सदैव आनंदी आणि प्रोत्साहित ठेवा. त्यांना नवे कौशल्य आत्मसात करायला सांगा व त्यासाठी मदत करा.
5. भांडवल व्यवस्थापन - तुम्हा सर्वाना माहिती आहे  की भांडवल म्हणजे पैसे. किती सेवा देणे चालू आहे आणि साधनसामुग्री किती लागत आहे ह्यावर लक्ष ठेवा. पुरवठा करणारे सवलतीच्या दरात सामुग्री देतात म्हणून भरमसाठ साठा  करू नका .
6. आर्थिक व्यवस्थापन - सर्व यशस्वी सलून व्यावसायिकांचे योग्य आर्थिक व्यवस्थापन असते. ते तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण मिळवून देते आणि तुम्ही किती नफा मिळवू शकता तेही दाखवते
7. आर्थिक दस्तावेज समजून घेणे - एक व्यावसायिक सलून चालवताना तुम्ही नफा तोट्याचा आर्थिक ताळेबंद आणि कागद पत्रे समजून घ्यायला हवीत. हे तुम्हाला व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शक ठरू शकतो व बँकेकडून लोन मिळवण्यात उपयोगी ठरू शकते.

सध्याच्या आधुनिक आणि अद्ययावत सलून उद्योगामध्ये व्यावसायिकांना उत्पन्नाच्या अनेक संधी खुणावत आहेत. एकाच व्यक्तीने सगळी मेहनत पणाला लावण्यापेक्षा या व्यवसायाचे नियोजन सांघिकरीत्या करून यशस्वी व्यवसाय उभारणी करण्यासाठी एखाद्याला मदत करणे ही संकल्पना आता रुजत आहे. व्यवसाय सुरु करण्यापूर्वी एखाद्या सलून व्यावसायिक मार्गदर्शकाचा सल्ला घेणे नक्कीच फायद्याचे ठरेल.

from lifestyle https://ift.tt/iTHAYP3
via IFTTT

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section