Coming soon

Commonwealth Games 2022: अचिंता शेउलीने रचला इतिहास! वेटलिफ्टिंगमध्ये मिळवले सुवर्णपदक; भारताकडे आतापर्यंत सहा पदक

Commonwealth Games 2022 : बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर अचिंता शेउलीने (Achinta Sheuli) आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने वेटलिफ्टिंगमध्ये (Weight Lifting) 313 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. अचिंताने पहिल्या स्नॅच फेरीत 137 किलो वजन उचलले. दुसऱ्या लिफ्टमध्ये त्याने 139 किलो वजन उचलले. यानंतर अचिंताने तिसऱ्या लिफ्टमध्ये 143 किलो वजन उचलले. अशाप्रकारे त्याने स्नॅचमध्ये 143 किलो वजन उचलले. 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा अचिंता शेउली हा भारतातील तिसरा ऍथलीट आहे. त्याने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक पटकावले.

No. 3 for team 🇮🇳 as #AchintaSheuli wins the 73 KG category in style creating a #gamesrecord at @birminghamcg22 with a total lift of 313 KG. Unstoppable #EkIndiaTeamIndia #B2022 pic.twitter.com/QsP4hNI4fj
— Team India (@WeAreTeamIndia) July 31, 2022

सुवर्णपदकासाठी चुरशीची स्पर्धा

क्लीन अँड जर्कमध्ये अचिंताचा सामना मलेशियाच्या मोहम्मदविरुद्ध होता. सुवर्णपदकासाठी दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा होती. पहिल्या क्लीन अँड जर्क प्रयत्नात 170 अचिंतला 170 किलो वजन उचलता आले नाही. मात्र, त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 170 किलो वजन उचलले. अशाप्रकारे त्याने 313 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे हे तिसरे गोल्ड मेडल आहे. विशेष म्हणजे सर्व गोल्ड मेडल्स वेटलिफ्टिंगमध्ये आले आहे.

सुवर्णपदक जिंकणारा दुसरा पुरुष खेळाडू

याआधी रविवारी जेरेमी लालरिनुंगाने वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. बर्मिंगहॅम 2022 कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो भारतातील पहिला पुरुष खेळाडू ठरला. त्याचबरोबर अचिंता सुवर्णपदक जिंकणारा दुसरा पुरुष खेळाडू ठरला आहे. 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत भारताला सहा पदके मिळाली असून सर्व पदके वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत.

हे देखील वाचा-

<a href="https://ift.tt/8Trd5n3 2022: जेरेमी लालरिनुंगानं देशासाठी सुवर्ण जिंकलं! वेटलिफ्टिंगमध्ये भारताचा दबदबा, स्पर्धेतील पदकसंख्या पाचवर

<a href="https://ift.tt/avfPKEi Devi: वेटलिफ्टिंगमध्ये बिंद्याराणी देवीची धडाकेबाज कामगिरी, देशासाठी रौप्यपदक जिंकलं, भारताच्या खात्यात चौथं पदक

from sports https://ift.tt/ou16J4U
via IFTTT
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section