Coming soon

Shreeshankar Murli: त्यानं ठरवलंच होतं, भारतासाठी पदक जिंकायचंच! लॉन्ग जंपमध्ये श्रीशंकरनं रौप्यपदक पटकावलं

Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ लॉन्ग जंप इव्हेंटच्या अंतिम सामन्यात भारताचा लांब उडीपटू एम श्रीशंकरनं (Murli Shreeshankar) रौप्यपदक जिंकून बर्मिंगहॅममध्ये तिरंगा फडकावलाय. मुरली श्रीशंकरनं 8.08 मीटर उडी मारली आणि भारताच्या झोळीत आणखी एक पदक पडलं. महत्वाचं म्हणजे, कॉमनवेल्थ लॉन्ग जंप इव्हेंटमध्ये पदक जिंकणारा मुरली श्रीशंकर पहिला पुरुष खेळाडू ठरलाय. बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय खेळाडूं सातत्यानं दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. भारतानं कॉमनवेल्थ स्पर्धेत आतापर्यंत 19 पदकं जिंकली आहेत. ज्यात पाच सुवर्ण, सहा रौप्य आणि सात कांस्यपदकांचा समावेश आहे.

भारताच्या लांब उडीपटू मुरली श्रीशंकरनं ट्रॅक आणि फील्डमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून दिलंय. श्रीशंकरनं अंतिम फेरीत 8.08 मीटरच्या सर्वोत्तम उडीसह रौप्यपदक जिंकलं. यासह श्रीशंकर कॉमनवेल्थ स्पर्धेच्या इतिहासातील लांब उडी स्पर्धेत भारतासाठी पदक जिंकणारा पहिला पुरुष खेळाडू ठरलाय. यापूर्वी महिला माजी खेळाडू अंजू बॉबी जॉर्ज आणि प्रज्यूषा यांनी देशासाठी पदकं जिंकली आहेत. अंजू बॉबीनं 2002 मध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेत कांस्य आणि 2010 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेत प्रज्यूषानं रौप्यपदक जिंकलं होतं. लांब उडीत प्रज्युषा पहिलं रौप्य पदक जिंकलं होतं. त्यानंतर आज मुरली श्रीशंकनं रौप्यपदक पटकावलंय.

ट्वीट-

[tw]https://twitter.com/SportsIndia3/status/1555285682708365312[/tw]

कॉमनवेल्थ 2022 मध्ये पदक जिंकलेले भारतीय खेळाडू

सुवर्णपदक- 5 (मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ.)

रौप्यपदक- 7 (संकेत सरगरी, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर.)

कांस्यपदक- 7 (गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरजीत सिंह,  तेजस्वीन शंकर.)

हे देखील वाचा-

<a href="https://ift.tt/nx1zCWb 2022: मिचेल स्टार्कचा धाकटा भाऊ कॉमनवेल्थ स्पर्धेत गाजवतोय मैदान, ऑस्ट्रेलियासाठी रौप्यपदक जिंकलं!

<a href="https://ift.tt/dzPcKyA 2022: स्मृती मानधनाचं रोहित शर्माच्या पावलावर पाऊल, टी-20 क्रिकेटमध्ये गाठला विक्रमी टप्पा!

<a href="https://ift.tt/15apoLD 2022: भारतीय हॉकी संघानं वेल्सला 4-1 नं नमवलं, सलग चौथ्यांदा कॉमनवेल्थच्या उपांत्य फेरीत

from sports https://ift.tt/KdLUgqz
via IFTTT
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section