Pomegranate डाळींबाचे पीक कसे घ्यावे
डाळिंबाची माहिती लागवडी पासून ते उत्पादनापर्यंत:
डाळिंब सविस्तर व पौष्टिक आहे टाईम फळांमध्ये आणि औषधी गुणधर्म ठरलेले आहेत वचनक्रिया सुरळीत चालण्यासाठी डाळिंब मदत करतो महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, सांगली, सोलापूर, वाशिम येथे लागवड केली जाते महाराष्ट्रामध्ये अंदाजे 73027 हेक्टर क्षेत्र डाळिंब पिकाखाली आहे. डाळिंब पिकापासून भरपूर उत्पादन मिळू शकते तर जाणून घेऊयात पिक लागवड बद्दल माहिती.
जमीन व हवामान-
१. डाळिंबाचे पीक सुपीक, काली, निकष, भारी, मध्यम अशा सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते.
२. पाण्याचा निचरा करणारे गावाची जमीन निवडल्यास उत्पादन जास्त चांगले होते.
३. डाळिंब विकास कोरडे व थंड हवामान मानवते.
४. कडक ऊन, कडक थंडीतही डाळिंबाचे पीक घेता येते.
५. भरपूर व कोरडे हवामान असल्यास डाळिंबाची फळे गोड येतात.
डाळिंबाच्या जाती-
१. मस्कत या जातीचे फळे आकाराने मोठे असतात या फळांची साले फिक्कट हिरवी ते लाल रंगाची असतात त्यांचे दाणे पांढरे व गुलाबी असतात या वर्णाचे उत्पादन चांगले होते.
२. गणेश वालाची सर्वात जास्त संख्येने लागवड केली जाते या फळात साखरेचे प्रमाण जास्त असते या वानापासून भरपूर प्रमाणात उत्पादन मिळते.
३. मृदुला वाणाची फळे लहान ते मध्यम आकाराचे असतात त्यांचे दाणे लाल रंगाचे असतात.
लागवड-
१. उन्हाळ्यात जमीन आडवी उभी नांगरट करून जमीन सपाट करून घ्यावी.
२. भारी जमीन असेल तर ५ x ५ मिटर अंतरावर झाडाची लागवड करावी.
३. 60 x ६० सेमी आकाराचे खड्डे करून त्यात वाळलेल्या पाचोळ्याचा १५ ते २० सेमी जाडीचा थर टाकावा या थरावर 20 ते 25 किलो शेणखत १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट मिसळून जमीन भरून घ्यावी.
४. डाळिंब पिकाची लागवड पावसाळ्यात करावी.
५. डाळिंब पिकाची कलम लावल्यानंतर त्यास बेताचे पाणी द्यावे.
६. लागवडीनंतर काही काळ त्यास आवश्यकतेनुसारच पाणी द्यावे.
खते-
१. पहिल्या वर्षी २५० ग्रॅम नत्र, 125 ग्रॅम्फुरद, 125 ग्रॅम पालाश द्यावेत.
२. दुसऱ्या वर्षी 250 ग्रॅम नत्र, 250 ग्रॅम स्फुरद, 250 ग्रॅम पालाश द्यावेत.
३. तिसऱ्या वर्षी व चौथ्या वर्षी 500 ग्रॅम नत्र, 250 ग्राम स्फुरद 250 ग्रॅम द्यावेत.
४. पाच वर्षानंतर प्रत्येक झाडास दहा ते पंधरा किलो शेणखत द्यावे.
पाणी व्यवस्थापन-
१. पावसाळ्यात पाऊस कमी पडल्यास आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
२. फळे येऊ पर्यंत ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी देणे.
३. फुले येण्यास सुरुवात झाल्यानंतर नियमित पाणी द्यावे.
४. अनिमितपणे व जास्त प्रमाणात पाणी दिले तर डाळिंब फळास तडे जातात.
आंतरमशागत-
१. झाडांच्या मुळाभोवती जमीन भुसभुशीत राहू द्यावी हवा खेळते राहिल याची काळजी.
२. बागेतील तण काढून हलकी मशागत करावी.
काढणी-
१. एका झाडावर 60 ते 80 फळी ठेवावीत जास्त फळे ठेवल्यास फळे आकाराने लहान होतात.
२. फुलोऱ्यानंतर 150 ते 210 दिवसात फळे परिपक्व होतात.
३. अपरिपक्व किंवा अतिपरिपक व फळे तोडल्यास फळांची प्रति बिघडते.
४. फळांचा रंग किंचित पिवळा झाला की त्यांची तोडणी करावी.
उत्पादन-
१. पाच ते सहा वर्षाच्या एका झाडापासून 70 ते 80 फळे मिळतात.
२. आठ ते दहा वर्षाच्या एका झाडापासून 150 ते 200 फळे मिळतात.
३. बुरशीनाशक प्रक्रिया करून ही फळे 90 दिवसापर्यंत साठवून ठेवता येतात.
अशा सर्व प्रकारच्या जमिनीत चांगला प्रतिसाद होणाऱ्या डाळिंब पिकाची लागवड नक्कीच तुम्हाला फायदा करून देईल.
Labels: Pomegranate
2 Comments:
👍👍👍
Bhari
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home