Monday, October 10, 2022

ग्रामीण भागात करू शकता हे व्यवसाय

 ग्रामीण भागात करू    शकता हे व्यवसाय:


कोणताही व्यवसाय असो त्यात महत्त्वाचे म्हणजे विक्री मग आपण एखाद्या उत्पादन किंवा सर्विस विकू शकतात त्यामुळे कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं की सर्वात आधी लोकांच्या घरचा काय आहे आणि आपण लोकांना काय विकू शकतो याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे याच अभ्यासातून कोणता व्यवसाय करावा याचे उत्तर आपोआप मिळते नवीन उद्योग करायचा म्हटलं की त्यासाठी भांडवल, मार्केटिंग स्किल,अनुभव या सर्व गोष्टींची आवश्यकता असते पण असे काही व्यवसाय आहेत की जिथे ह्या गोष्टी नसल्या तरी तुम्हाला चांगला व्यवसाय करू शकता मुख्यतः ग्रामीण भागात तुम्ही काय उद्योग करू शकता हे आपण पाहू.

किराणा दुकान स्टोअर;



१. दैनंदिन जीवनात लोकांना अनेक खाद्य वस्तूंची आवश्यकता असते अशा रोज लागणाऱ्या वस्तूंची गरज लक्षात घेऊन तुम्ही किराणा दुकान/किरकोळ स्टोअर चालू करू शकता एका लहानशा गावात व्यवसाय चालवण्यासाठी आपण उत्पन्न मिळण्यासाठी हा चांगला मार्ग आहे एकदा का लोकांना गावातच खरेदीची सवय लागली की मग व्यवसाय मोठा व्हायला वेळ लागत नाही.

पाणी रिफील स्टेशन;



२. गावात आज पिण्याच्या स्वच्छ पाण्याची समस्या गहन होत चालली आहे त्यामुळे पाणी रिफील स्टेशन/मोबाईल व्हॅन एक चांगला व्यवसाय आहे अशा मोबाईल प्युरिफिकेशन सिस्टम खरेदी करण्यासाठी कर्ज सुविधा पण उपलब्ध आहे ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तिथे हा खरोखर फायदेशीर व्यवसाय आहे.

 ॲक्सेसरीज, सिम कार्ड,   रिचार्ज आणि रिपेरिंग   सर्विस;



३. मोबाईल आज चे न राहता गरजेचा झाला आहे ग्रामीण भागात सुद्धा लोकांकडे सर्रास मोबाईल दिसून येतो मोबाईल साठी लागणाऱ्या ॲक्सेसरीज सिम कार्ड, रिचार्ज, आणि रिपेरिंग सर्विस यांची मागणी पण खूप वाढले आहे हा व्यवसाय सुरू करायला गुंतवणूक कमी आणि फायदा जास्त आहे.

आईस्क्रीम;



४. लहान मुलं असो किंवा मोठी व्यक्ती आईस्क्रीम सगळ्यांनाच आवडते जर तुमच्या गावात आसपास जवळ कुठे आईस्क्रीम शॉप नसेल तर तुम्ही आईस्क्रीम शॉप ला रिटेलिंग व्यवसाय यशस्वीरित्या प्रारंभ करू शकतात अनेक मोठ्या फॅंचायसी घेऊ शकता.

Book stall;



५. आपण एका लहानशा गावात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असल्यास एक पुस्तक स्टोअर म्हणू शकतात या स्टोअर मध्ये तुम्ही विविध लेखकांची विविध सिलिंगची पुस्तके विकू शकतात अथवा भाड्याने देऊ शकता.

हॉटेल;



६. माणसाच्या मूलभूत गरजांपैकी एक म्हणजे अन्न त्यात खाण्यांची कुठेच काही कमी नाही त्यामुळे चवीने खाणारे कधी कमी होत नाही त्यामुळे एखादा हॉटेल सुरू करू शकता अगदी चहा भेळ मिसळ भजी वडापाव तरी वडा समोसे यासारख्या भरपूर खपणाऱ्या खाद्यपदार्थांचे हॉटेल सुरू करू शकतात पुढे जाऊन त्याचे रूपांतर मोठ्या हॉटेलमध्ये करून प्रगती करू शकतात तसेच पाहिले तर हॉटेल व्यवसायाला कधीच मरण नाही.

फार्मसी स्टोअर;



७. रिटेल फार्मसी स्टोअर हा एक आदर्श किरकोळ व्यवसाय आपण जर परवानाधारक फार्मासिस्ट असल्यास किंवा एखाद्याचे लायसन्स भाडेतत्त्वावर घेऊन आपण रिटेल फार्मसी स्टोअर करू शकता या विविध निर्मात्यांकडून बनलेले उत्पादने औषधे आणि वैद्यकीय पुरवठा तसेच इतर दैनंदिन लागणाऱ्या वस्तू आणि विक्री करू शकतात.

जनरल स्टोअर;



८. लोकांना रोज अनेक वस्तूंची गरज भासते उदाहरणार्थ, वह्या, पेन, रिफील, ग्रीटिंग्स, गिफ्ट, खेळणी, मेहंदी, ब्युटी, क्रीम्स, इत्यादी अशा सगळ्या वस्तू आपण जनरल स्टोअर्स च्या माध्यमातून विक्री करू शकतात ज्या ज्या वस्तू लोकांना दररोज लागतात त्या तुम्ही येथे उपलब्ध करून विकू शकता.

फोटोग्राफी स्टुडिओ;



९. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे चांगले नवनवीन फोटो साठी खूप मागणी वाढत आहे तुम्हाला जर फोटोग्राफी करायला आवडत असेल आणि फोटो काढण्यासाठी लागणारे कौशल्य जर तुमच्याकडे असेल तर फोटोग्राफी व्यवसाय तुम्ही लहानशा गावात यशस्वीरिति प्रारंभ करू शकतात एक चांगला स्टुडिओ छायाचित्रकार म्हणून आपण केवळ आपल्या फोटो स्टुडिओमध्येच लोकांना आकर्षित करणार नाही तर आपल्याला विवाह समारंभ वाढदिवस राजकीय सभा मैफिली इत्यादी सारख्या कार्यक्रमांच्या ऑर्डर पण घेता येतील.

इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक;



१०. आज प्रत्येक घरात अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा उपयोग केला जातो व नवीन उत्पादनांची मागणी पण चांगली असते वस्तू आहे म्हणजे ती खराब होणार नाही दुरुस्त करण्यासाठी चांगला इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक लागणार इलेक्ट्रॉनिक वस्तू उदाहरणार्थ टीव्ही मोबाईल पंखे फ्री यासारख्या वस्तूंचे रिपेअरिंग सेंटर आपण सुरू करू शकतात पण त्याआधी रिपेरिंगची ट्रेनिंग घ्यावी लागते.

संगणकाची दुरुस्ती;



११. जर तुम्हाला संगणक दुरुस्तीचे ज्ञान असेल तर तुम्ही संगणकाची दुरुस्ती लॅपटॉप आणि डेस्कटॉप हा व्यवसाय सुरू करू शकतात या व्यवसायात आपल्या फक्त संगणक दुरुस्ती कौशल्य प्राप्त करणे आवश्यक दुरुस्तीची साधने खरेदी करणे आणि नंतर एका चांगल्या ठिकाणी दुकान उघडणे आवश्यक आहे या प्रकारच्या सेवांसाठी खूप मागणी आहे.

बेकरी प्रॉडक्ट;



१२. बेकरी प्रॉडक्ट जसे ब्रेड खारी टोस्ट बिस्किट आणखी बरेच काही आपण स्वतः बनवून विकू शकता स्वतः बनवणे शक्य नसल्यास जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या काही मोठ्या विक्री असतील त्यांच्याकडून होलसेल मध्ये विकत घेऊन स्थानिक बाजार विकू शकता.


व्यवसाय म्हणजे विक्री हा नियम लक्षात ठेवा काय विकायचे ठरवा आणि कामाला लागा.



वरील माहिती आपणास उपयोगी वाटली का अजून काही व्यवसाय आहेत का जे ग्रामीण भागात चांगले फायदेशीर ठरू शकतात आम्हाला खाली कमेंट करून कळवा.


Labels:

3 Comments:

At October 10, 2022 at 8:27 AM , Blogger Marathi News 24 said...

Okkk

 
At October 10, 2022 at 8:34 AM , Blogger Ssucessfullylifemindness said...

👌👌👌👌👌

 
At October 10, 2022 at 9:02 AM , Blogger Marathi News 24 said...

मस्त

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home